शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

महसूलमंत्र्यांचा कृत्रिम दुधाचा कारखाना: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:33 IST

सांगली : दूध आंदोलनामुळे मुंबईवर काहीच फरक पडणार नाही, असा दावा करणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कृत्रिम दुधाचा कारखाना असावा. या कारखान्यातून ते दुधाचा पुरवठा करणार असतील, अशा शब्दात रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी महसूलमंत्र्यांवर हल्ला चढविला. दूध आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहणार आहे. पण पोलिसांकडून ...

सांगली : दूध आंदोलनामुळे मुंबईवर काहीच फरक पडणार नाही, असा दावा करणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कृत्रिम दुधाचा कारखाना असावा. या कारखान्यातून ते दुधाचा पुरवठा करणार असतील, अशा शब्दात रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी महसूलमंत्र्यांवर हल्ला चढविला. दूध आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहणार आहे. पण पोलिसांकडून उत्पादकांना त्रास दिला जात आहे. या कारवाया थांबवाव्यात, अन्यथा शेतकरी पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला.सांगलीतील अपक्षांच्या आघाडीच्या मेळाव्यासाठी खा. शेट्टी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दूध उत्पादनाचा खर्च ३५ रूपयांपर्यंत असताना, शेतकºयांना ते १७ ते १८ रूपयांना विकावे लागते. पाण्याची बाटलीसुध्दा २० रूपयाला मिळते. यात शेतकºयांचा काय दोष? या लुटीचे उत्तर सरकारने द्यावे. यापुढे आम्ही तोटा सहन करणार नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाला दुधाचा अभिषेक घालून रात्रीपासून दूध आंदोलनाला सुरूवात होईल. आम्ही मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखणार आहोत. शासनाकडून जर पोलिसांच्या माकड कारवाया थांबल्या नाहीत, तर शेतकरी ते सहन करणार नाहीत. जर कायदा व सुव्यवस्था बिघडली, तर त्याला सरकार जबाबदार असेल.या आंदोलनाचा शहरी लोकांना त्रास होईल. त्याबद्दल मी माफी मागतो. शहरी नागरिकांना दूध हवे असेल तर गावाकडे या, तुम्हाला मोफत दूध देऊ. यानिमित्ताने शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना शेणा-मातीत किती कष्ट करावे लागतात, हेही त्यांना समजेल. त्यांचे दु:ख तुम्ही डोळ्याने बघूनच, शेतकºयांचा संताप योग्य की अयोग्य ते ठरवा. शेतकºयांनी दूध डेअरीमध्ये घालू नये, पण ते रस्त्यावरही ओतू नका. दूध गरिबांना, झोपडपट्टीमध्ये, शाळेत मुलांना, अनाथाश्रमात द्या, चार दिवस मिठाई बनवा, हवी तर तीही गरिबांमध्ये वाटा. लाखो लोक पंढरीच्या वारीत आहेत. ते दूध वारीत पाठवा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.आंदोलन ग्राहकविरोधी नाहीहे आंदोलन ग्राहकांच्या विरोधात नाही. कारण आम्ही दुधाच्या विक्रीचे दर वाढवा असे कधीच म्हटले नाही. दुधाच्या विक्रीवर दुधाच्या खरेदीचे दर ठरत नाहीत. प्लास्टिकच्या पिशवीत केवळ ३५ ते ४० टक्के इतकेच दूध असते. उर्वरित दुधावर प्रक्रिया करून उपपदार्थ बनविलेले असतात. या व्यवसायात मंदी आहे, त्याला केंद्र सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. ही मागणी जोपर्यंत शासन पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आमच्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. तो आमचा अधिकार आहे, असेही शेट्टी म्हणाले.कंपन्यांसाठी अनुदानतीन रूपयांचे अनुदान हे शासनाचे धोरण नसून पावडर निर्माण करणाºया खासगी कंपन्यांचे आहे. ते १६ रूपयांनी दूध खरेदी करतात, त्यात ३ रुपये देऊन काय उपकार करत नाहीत. त्यांना यापूर्वीच पावडर तयार करण्यासाठी ३ रुपये अनुदान मिळालेले आहे. शिवाय निर्यातीसाठी ५० रुपये अनुदान दिले आहे. यामध्ये त्यांचा आठ रूपयांचा नफाच आहे, असे गणितही शेट्टी यांनी मांडले.